मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या शोरूमचे अभिनेते

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या शोरूमचे अभिनेते अनिल कपूर यांच्या हस्ते झक्कास... उद्घाटनजगातील सर्वात मोठी रिटेल ज्वेलरी साखळी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या शोरूमचे उद्घाटन सरसन प्लाझा, गोखले हॉलच्या विरुद्ध, लक्ष्मी रोड, पुणे येथे मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांच्या हस्ते झाले. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या या नवीन शोरूममध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार दागिने ठेवलेले  आहेत. आधुनिक, पारंपारिक, स्टाईलिश तसेच समकालिन डिझाइनर दागिन्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.  या शोरुममध्ये बीआयएस हॉलमार्क, माइन ब्रँड डायमंड्स( यामध्ये २८ वेगवेगळ्या लॅब मधून त्याची गुणवत्ता तपासली जाते आणि त्यानंतर त्यांना जीआयए, आयजीआय प्रमाणपत्र दिले जातात) एरा अनकुट डायमंड ज्वेलरी, प्रिकिया रत्न ज्वेलरी, भारतीय हेरिटेज डिझाइन, एथनिक्सच्या ब्रँड अंतर्गत हस्तकलेच्या डिझाईनर ज्वेलरी आणि मुलांसाठी स्टारलेट डिझाईन्स नवीन शोरूमचे प्रमुख आकर्षण आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ज्वेलरीमध्ये ट्रेंडी डिझाइनचे लक्षवेधी संग्रह प्रदर्शित करीत आहेत.
यावेळी बोलताना अनिल कपूर म्हणाले की, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या या नवीन शोरूममध्ये ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊनच दागिने ठेवलेले आहेत. ज्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचा समावेश आहे. 
यावेळी बोलताना मलाबार ग्रूपचे चेअरमन एम.पी. अहमद म्हणाले की, पारदर्शकता, गुणवत्ता आणि सचोटी हाच आमच्या व्यवसायाचा गाभा आहे. सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या आवडीनुसार डिजाईन करण्यात आलेले दागिने यामुळे आम्हाला जागतिक मान्यता प्राप्त झाली आहे. ते पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या ग्राहकांचे कृतज्ञ आहोत ज्यांनी आमच्या व्यवसायात त्यांचा विश्वास दाखवला आहे. आम्ही पुढे महाराष्ट्रात आणखी दुकाने उघडण्याचा आमचा मानस आहे. आम्ही उच्च प्रतीची उत्पादने, नवीन तंत्रज्ञान आणि प्रामाणिक व्यापाराद्वारे ग्राहकांना पैशाचे मूल्य सुनिश्चित करण्यास वचनबद्ध आहोत. या प्रसंगी स्टोर हेड शाहीन परवेझ, मॅनेजिंग डायरेक्टर आशेर ओ, एग्ज़िक्युटिव डायरेक्टर अब्दुल सालेम, रिजनल हेड सुबैर एम पी,  अभिनेता अनिल कपूर, एम. पी मोहम्मद, फांझीम अहमद उपस्थित होते.  

Download Our Free App